🎯 eMPSCKatta 🎯
رفتن به کانال در Telegram
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
نمایش بیشتر2025 سال در اعداد

109 478
مشترکین
-2724 ساعت
-2107 روز
-77930 روز
آرشیو پست ها
Repost from मराठी व्याकरण
🔹मराठी व्याकरण🔹
शब्दाच्या जाती
1)नाम -
जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड
2)सर्वनाम-
जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही
3) विशेषण-
जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच
4)क्रियापद-
जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे
5)क्रियाविशेषण-
जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या
6) शब्दयोगी अव्यय-
जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी
7) उभयान्वयी अव्यय-
जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा
8) केवलप्रयोगी अव्यय-
जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब
______________________________________
आमचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा : @Marathi
❤ 26
Photo unavailableShow in Telegram
निवडणूक निकाल
● भाजप - 117
● शिवसेना -53
● राष्ट्रवादी -37
● काँग्रेस -28
● शिवसेना (उध्दव ठाकरे) - 9
● राष्ट्रवादी - 7
❤ 20
TAIT_2025_स्वप्रमाणपत्र_पूर्ण_करणेबाबत_सूचना_15_12_2025.pdf
TAIT_2025_स्वप्रमाणपत्र_पूर्ण_करणेबाबत_सूचना_15_12_2025.pdf3.81 KB
❤ 5🔥 1
Photo unavailableShow in Telegram
नमुंमपा आस्थापनेवर 'गट - ब' मधील सरळसेवा पदभरती
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ‘गट ब’ मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेव्दारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी-शर्तींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवेतील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट ‘ब’ मधील एकूण 07 पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. 5 जानेवारी 2026 पासून ते दि. 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दि. 4 फेब्रुवारी 2026 रोजी, रात्री 11.55 वा. पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र हे प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. यामधील संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द केली जाईल.
❤ 28🔥 2😱 2
Photo unavailableShow in Telegram
ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर यांना संगीतभूषण पुरस्कार प्रदान
संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार आशा खाडिलकर यांना प्रदान करण्यात आला. [51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरुप होते.]
पं. राम मराठे राज्यस्तरीय युवा पुरस्कार नृत्य प्रकाराच्या युवा साधक निधी प्रभू यांना प्रदान करण्यात आला.
❤ 26🔥 5
Photo unavailableShow in Telegram
🔴'एमपीएससी' परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम.
👉 21 डिसेंबरची संयुक्त पूर्व गट 'ब' परीक्षा पुढे ढकलणार का? लवकरच आयोगाकडून स्पष्ट होईल
❤ 20👍 14😁 2😱 1
