fa
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

رفتن به کانال در Telegram

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

نمایش بیشتر
2025 سال در اعدادsnowflakes fon
card fon
222 185
مشترکین
-324 ساعت
+727 روز
+1 13330 روز
آرشیو پست ها
From Marathi Mhani app: गाढवाने शेत खाल्ल्याचे पाप ना पुण्य. Meaning: निरुपयोगी माणसावर केलेले उपकार अनाठायी जातात.
نمایش همه...
24
From Marathi Mhani app: गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. Meaning: एखादे काम सिद्धीस गेले तर ठीक, नाही तरी नुकसान नाही.
نمایش همه...
21
From Marathi Mhani app: गळा नाही सरी, सुखी निद्रा करी. Meaning: ज्या स्त्रीच्या अंगावर दागिने नसतात, तिला सुखाने झोप लागते.
نمایش همه...
39
From Marathi Mhani app: गर्जेल तो पडेल काय? Meaning: केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही कृती होत नाही.
نمایش همه...
43👍 2
From Marathi Mhani app: गरीबानं खपावं, धनिकानं चाखावं. Meaning: गरिबाने कष्ट करावेत आणि श्रीमंताने माल खावा.
نمایش همه...
42
From Marathi Mhani app: गरीबाच्या दाराला सावकाराची कडी. Meaning: गरिबावर सावकाराचा अंमल.
نمایش همه...
34👏 2
From Marathi Mhani app: गरजवंताला अक्कल नसते. Meaning: गरजेमुळे अडलेल्या, दुसऱ्याचे निमूटपणे ऐकून घ्यावे लागते.
نمایش همه...
26👏 1🤔 1
From Marathi Mhani app: गरज सरो अन् वैद्य मरो. Meaning: ज्याने आपली गरज भागविली त्याला विसरुन जाणे.
نمایش همه...
28
🔹समास ✴✴✴बहुव्रीही समास✴✴✴ ✳ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)   ❇वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)   ❇दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात. 🔵i) विभक्ती बहुव्रीही समास - ✳ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.   ✳अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती   ❇जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती   ❇जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती   ❇गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती 🔵ii) नत्र बहुव्रीही समास - ✳ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.  या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. ✴उदा.     ❇अनंत - नाही अंत ज्याला तो   ❇निर्धन - नाही धन ज्याकडे तो   ❇नीरस - नाही रस ज्यात तो 🔵iii) सहबहुव्रीही समास - ✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. ✴उदा.     ❇सहपरिवार - परिवारासहित असा जो   ❇सबल - बलासहित आहे असा जो   ❇सवर्ण - वर्णासहित असा तो 🔵iv) प्रादिबहुव्रीही समास - ✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇सुमंगल - पवित्र आहे असे ते   ❇सुनयना - सु-नयन असलेली स्त्री   ❇दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती
نمایش همه...
80👍 7
Follow करा आमचे व्हॉ'ट्सअ'प चॅनेल : https://shorturl.at/ddNxM
نمایش همه...
12👍 2
💢 शब्दसिद्धी व त्याचे प्रकार💢 शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात. ⭕शब्दांचे खालील प्रकार पडतात. 🌀 तत्सम शब्द जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात. 💠उदा. राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध. 🌀 तदभव शब्द जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात. 💠उदा. घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय. 🌀देशी/देशीज शब्द महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात. 💠उदा. झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर. 🌀 परभाषीय शब्द : संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात. 🌀1) तुर्की शब्द 💠कालगी, बंदूक, कजाग 🌀2) इंग्रजी शब्द 💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी. 🌀 3) पोर्तुगीज शब्द बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस. 🌀4) फारशी शब्द 💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता. 🌀 5) अरबी शब्द अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल. 🌀6) कानडी शब्द हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे. 🌀7) गुजराती शब्द सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट. 🌀8) हिन्दी शब्द बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली. 🌀 9) तेलगू शब्द ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी. 🌀10) तामिळ शब्द चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा. ....,.......
نمایش همه...
118👌 6🔥 3
र्हास = हानी    राग = क्रोध, संताप, चीड राजा = नरेश, नृप राष्ट्र = देश रांग = ओळ रात्र = निशा, रजनी, यामिनी रान = वन, जंगल, अरण्य, कानन रूप = सौंदर्य रुबाब = ऐट, तोरा  रेखीव = सुंदर, सुबक लग्न = विवाह, परिणय  लाट = लहर लाज = शरम, लोभ = हाव वस्त्र = कपडा वारा = वात, पवन, अनि ----------- जॉइन करा @Marathi
نمایش همه...
63👍 4🔥 3
समानार्थी शब्द ➖➖➖➖➖ कुतूहल = उत्सुकता कुटुंब = परिवार कुशल = हुशार, तरबेज   कुत्रा = श्वान  कुटी = झोपडी कुचंबणा = घुसमट कृपण = कंजूष कृश = हडकुळा कोवळीक = कोमलता कोठार = भांडार कोळिष्टक = जळमट खण = कप्पा  खडक = मोठा दगड, पाषाण खटाटोप = प्रयत्न खग = पक्षी खड्ग = तलवार खरेपणा = न्यायनीती ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक खात्री = विश्वास खाली जाणे = अधोगती  खिडकी = गवाक्ष खेडे = गाव, ग्राम  खोड्या = चेष्टा, मस्करी गरज = आवश्यकता गवत = तृण गर्व = अहंकार गाय = धेनू, गोमाता गाणे = गीत, गान गंमत = मौज, मजा गंध = वास, दरवळ ग्रंथ = पुस्तक  गाव = ग्राम, खेडे गुन्हा = अपराध गुलामी = दास्य गोड = मधुर  गोणी = पोते गोष्ट = कहाणी, कथा गौरव = सन्मान  ग्राहक = गिऱ्हाईक घर = सदन, गृह, निकेतन, आलय घरटे = खोपा घागर = घडा, मडके  घोडा = अश्व, हय, वारू चव = रुची, गोडी चरण = पाय, पाऊल चरितार्थ = उदरनिर्वाह  चक्र = चाक  चऱ्हाट = दोरखंड चाक = चक्र चंद्र = शशी, रजनीनाथ, इंदू चिंता = काळजी चिडीचूप = शांत चिमुरडी = लहान चूक = दोष  चेहरा = मुख चौकशी = विचारपूस छंद = नाद, आवड छान = सुरेख, सुंदर छिद्र = भोक जग = दुनिया, विश्व जत्रा = मेळा जन = लोक, जनता  जमीन = भूमी, धरती, भुई जंगल = रान जीव = प्राण जीवन = आयुष्य, हयात जुलूम = अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय  झाड = वृक्ष, तरू झोपडी = कुटीर, खोप झोप = निद्रा  झोका = झुला झेंडा = ध्वज, निशाण ठग = चोर ठिकाण = स्थान डोके = मस्तक, शीर्ष, शीर डोळा = नेत्र, नयन, लोचन डोंगर = पर्वत, गिरी ढग = मेघ, जलद, पयोधर, अभ्र ॠण = कर्ज तक्रार = गाऱ्हाणे तळे = तलाव, सरोवर, तडाग त्वचा = कातडी तारण = रक्षण ताल = ठेका तुरंग = कैदखाना, बंदिवास तुलना = साम्य थट्टा = मस्करी, चेष्टा थवा = समूह थोबाड = गालपट   दगड = पाषाण, खडक दरवाजा = दार, कवाड दाम = पैसा  दृश्य = देखावा  दृढता = मजबुती दिवस = दिन, वार, वासर दिवा = दीप, दीपक दूध = दुग्ध, पय द्वेष = मत्सर, हेवा देव = ईश्वर, विधाता देश = राष्ट्र दार = दरवाजा दारिद्र्य = गरिबी दौलत = संपत्ती, धन  धरती = भूमी, धरणी ध्वनी = आवाज, रव नदी = सरिता  नजर = दृष्टी नक्कल = प्रतिकृती नमस्कार = वंदन, नमन  नातेवाईक = नातलग नाच = नृत्य निश्चय = निर्धार निर्धार = निश्चय निर्मळ = स्वच्छ नियम = पद्धत निष्ठा = श्रद्धा नृत्य = नाच नोकर = सेवक परिश्रम = कष्ट, मेहनत   पती = नवरा, वर पत्र = टपाल पहाट = उषा  परीक्षा = कसोटी पर्वा = चिंता, काळजी पर्वत = डोंगर, गिरी, अचल पक्षी = पाखरू, खग, विहंग प्रकाश = उजेड प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन प्रवासी = वाटसरू प्रजा = लोक प्रत - नक्कल प्रदेश = प्रांत प्रवास = यात्रा    प्राण = जीव पान = पत्र, पत्ता प्रासाद = वाडा पाखरू = पक्षी पाऊल = पाय, चरण पाऊलवाट = पायवाट प्रार्थना = स्तवन प्रामाणिकपणा = इमानदारी प्रारंभ = सुरुवात, आरंभ  प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा प्रोत्साहन = उत्तेजन पाऊस = वर्षा, पर्जन्य पाणी = जल, नीर, तोय, उदक पिशवी = थैली पुस्तक = ग्रंथ पुतळा = प्रतिमा, बाहुले पुरातन = प्राचीन पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा  फलक = फळा   फांदी शाखा फूल = पुष्प, सुमन, कुसुम बदल = फेरफार, कलाटणी बर्फ = हिम  बहीण = भगिनी बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार बाग = बगीचा, उद्यान, वाटिका बासरी = पावा बेत = योजना बाळ = बालक बाप = पिता, वडील, जनक बादशाहा = सम्राट बुद्धी = मती ब्रीद = बाणा   भरवसा = विश्वास भरारी = झेप, उड्डाण भव्य = टोलेजंग भाट = स्तुतिपाठक भारती = भाषा, वैखरी भांडण = तंटा  भाळ = कपाळ भाऊ = बंधू, सहोदर भेसळ = मिलावट भेदभाव = फरक भोजन = जेवण   मदत = साहाय्य ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य मन = चित्त, अंतःकरण मजूर = कामगार महिना = मास महिला = स्त्री, बाई, ललना मजूर = कामगार मस्तक = डोके, शीर, माथा  मानवता = माणुसकी मान = गळा  मंगल = पवित्र मंदिर = देऊळ, देवालय  मार्ग = रस्ता, वाट म्होरक्या = पुढारी, नेता  मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी मिष्टान्न = गोडधोड मुलगा = पुत्र, सुत, तनय मुलगी = कन्या, तनया  मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन मुख = तोंड, चेहरा मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम मैत्री = दोस्ती मौज = मजा, गंमत यश = सफलता युक्ती = विचार, शक्कल युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर योद्धा = लढवय्या रक्त = रुधिर रणांगण = रणभूमी, समरांगण
نمایش همه...
164👍 4👏 3👌 3
♦️आज झालेला राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर २०२५ 👉 ९ नोव्हेंबर २०२५ जॉइन करा @eMPSCkatta
نمایش همه...
MPSC PRE PAPER 1.pdf18.03 MB
16
📖केवल प्रयोगी अव्यय📖 आपल्या मनातील दु:ख, आश्चर्य इत्यादी भावना व्यक्त करणार्या शब्दांच्या केवलप्रयोगी अव्यय किंवा उद्गारवाची शब्द असे म्हणतात. 1. हर्षदर्शक : अहाहा, वाहवा, वा, अहा, वा-वा, ओ-हो 📄उदा. अहाहा! किती सुंदर दृश्य आहे. 2. शोकदर्शक : आई ग, अगाई, हाय, हायहाय, ऊं, अं, अरेरे 📄उदा. अरेरे! खूप वाईट झाले. 3. आश्चर्यदर्शक : ऑ, ओहो, अबब, अहाहा, बापरे, ओ, अरेच्या 📄उदा. अबब! केवढा मोठा साप 4. प्रशंसादर्शक : छान, वाहवा, भले, शाब्बास, ठीक, फक्कड खाशी 📄उदा. शाब्बास! तू दिलेले काम पूर्ण केलेस. 5. संमतीदर्शक : ठीक, जीहा, हा, बराय, अच्छा 📄उदा. अछा! जा मग 6. विरोधदर्शक : छेछे, अहं, ऊं, हू, हॅट, छट, छे, च 📄उदा. छे-छे! असे करू नकोस. 7. तिरस्कारदर्शक : शी, शु, शिक्क, इश्श, हुडत, हुड, फुस, हत, छत, छी 📄उदा. छी! ते मला नको 8. संबोधनदर्शक : अग, अरे, अहो, ए, अगा, अगो, बा, रे 📄उदा. अहो! एकलत का ? 9. मौनदर्शक : चुप, चुपचाप, गप, गुपचुप 📄उदा. चुप! जास्त बोलू नको ✳️✏️✳️✏️✳️✏️✳️ जॉइन करा @Marathi
نمایش همه...
69👍 15
*समास* *4) बहुर्वीही समास:* *ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून, त्या दोन पदाशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो, तसेच हा सामासिक शब्द त्या तिसऱ्याच पदाचे विशेषण असते, त्या सामासिक शब्दास बहुर्वीही समास म्हणतात.* या समासाचे चार प्रकार पडतात: *अ)विभक्ती बहुर्वीही:* विभक्ती बहुर्वीही समासाचे दोन प्रकार पडतात. १} *सामानाधीकरण:* विग्रह करताना यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. 1)लक्ष्मीकांत लक्ष्मी आहे कांता ज्याची विष्णू (प्रथमा) 2)वक्रतुंड वक्र आहे तुंड (तोंड) ज्याचे तो गणपती (प्रथमा) 3)नीलकंठ नील आहे कंठ ज्याचे तो शंकर (प्रथमा) 4)भक्तप्रिया भक्त आहे प्रिय जयला तो देव (प्रथमा) 5)जितेंद्रिय जीत आहेत इंद्रिय ज्याने तो मारुती (प्रथमा) 6)लंबोदर लांब आहे उदार ज्याचे असा तो गणपती (प्रथमा) 7पांडुरंग पांडूर आहे रंग ज्याचे असा तो विठ्ठल (प्रथमा) २ } *व्याधीकरण:* विग्रह करताना दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. 1)सुधाकर सुधा आहे करत असा तो (चंद्र) (प्रथमा/ सप्तमी) 2)गजानन गजाचे आहे आनन ज्याला तो (गणेश) (षष्ठी/ प्रथमा) 3)भालचंद्र भाळी आहे चंद्र ज्याच्या तो (शंकर) (सप्तमी/ प्रथमा) 4)चक्रपाणी चक्र आहे पानीत असा तो ( विष्णू) (प्रथम/ सप्तमी) *आ) नत्र बहुर्वीही समास:* *ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद अ, अन, न, नि, असे नकारदर्शक असेल तर, त्यास नत्र बहुर्वीही समास म्हणतात.* १)अव्यय नाही व्यय ज्याला ते २)अनंत नाही अंत ज्याला ते ३)निर्धन गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो ४)निरास नाही रस ज्यात ते ५)नाक नाही एक (दु:ख) ज्यात ते ६)अनादी नाही आदी ज्याला तो ७)अखंड नाही खंड ज्याला असे ते ८)अनियमित नियमित नाही असे ते ९)अनाथ जयला नाथ नाही असा तो १०)अस्पृश्य यला स्पर्श करत नाही असे ते ११)निर्बळ निघून गेलेले आहे बळ ज्यापासून तो १२)निर्बुद्ध ज्याला बुद्धी नाही असा तो १३)अकर्मक नाही कर्म जयला असे ते १४)नास्तिक नाही आस्तिक असा तो *इ) सहबहुर्वीही समास:* *जय बहुर्वीही समासाचे पहिले पद 'सह' किंवा 'स' अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुर्वीही समास म्हणतात.* १)सदर आदराने सहित असा तो २)सफल फळाने सहित असे ते ३)सवर्ण वर्णासहित असा तो ४)सहपरिवार परिवारासहित असा तो ५)सबल बलाने सहित असा तो *ई)प्रादि बहुर्वीही समास:* *ज्या बहुर्वीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, सु, दूर, वि अशा उपसर्गानी युक्त असते त्यास प्रादि बहुर्वीही समास म्हणतात.* १)सुमंगल पवित्र आहे असे ते २)दुर्गुणी गुणापासून दूर असलेला ३)प्रबळ अधिक बलवान असा तो ४)विख्यात विशेष ख्याती असलेला तो ५)निर्घुण निघून गेली आहे घृणा ज्यातून तो
نمایش همه...
96🙏 8🤔 3🔥 1
🔹समास व त्याचे प्रकार ✴✴✴बहुव्रीही समास✴✴✴ ✳ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇नीलकंठ - ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)   ❇वक्रतुंड - ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)   ❇दशमुख - ज्याला दहा तोंड आहे असा (रावण) बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात. 🔵i) विभक्ती बहुव्रीही समास - ✳ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते.   ✳अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇प्राप्तधन - प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती   ❇जितेंद्रिय - जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती   ❇जितशत्रू - जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती   ❇गतप्राण - गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती 🔵ii) नत्र बहुव्रीही समास - ✳ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात.  या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. ✴उदा.     ❇अनंत - नाही अंत ज्याला तो   ❇निर्धन - नाही धन ज्याकडे तो   ❇नीरस - नाही रस ज्यात तो 🔵iii) सहबहुव्रीही समास - ✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात. ✴उदा.     ❇सहपरिवार - परिवारासहित असा जो   ❇सबल - बलासहित आहे असा जो   ❇सवर्ण - वर्णासहित असा तो 🔵iv) प्रादिबहुव्रीही समास - ✳ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात. ✴उदा.     ❇सुमंगल - पवित्र आहे असे ते   ❇सुनयना - सु-नयन असलेली स्त्री   ❇दुर्गुण - वाईट गुण असलेली व्यक्ती
نمایش همه...
67
मराठी म्हणी भाग @marathi अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे. आपला हात जगन्नाथ - आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अति तेथे माती - कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा उठविणे. आईजीच्या जीवावर बाईजी उदार - दुसर्‍याचा पैसा खर्च करून औदार्य दाखविणे. आपल्याच पोळीवर तूप ओढणे - फक्त स्वत:चाच तेवढा फायदा साधून घेणे. आंधळे दळते कुत्रं पीठ खाते - एकानं काम करावं आणि दुसर्‍यांनं त्याचा फायदा घ्यावा. आधी पोटोबा मग विठ्ठोबा - आदी पोटाची सोय पाहावी नंतर देवधर्म करावा. अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखाद्या हुशार माणसाला देखील अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे - अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे. अति शहाणा त्याचा बैल रिकामा - जो माणूस फार शहाणपणा करायला जातो. त्याचे मुळीच काम होत नाही. आधी शिदोरी मग जेजूरी - आधी भोजन मग देवपूजा असतील शिते तर जमतील भुते - एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात. आचार भ्रष्टी सदा कष्टी - ज्याचे आचार विचार चांगले नसतात. तो नेहमी दु:खी असतो. आठ हात लाकूड अन नऊ हात ढिपली - अत्यंत मूर्खपणाची अतिशयोक्ती. आईचा काळ बायकोचा मवाळ - आईकडे दुर्लक्ष करून बायकोची काळजी घेणारा आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - मुळातच आळशी माणसाच्या आळशी वृत्तीला पोषक अवस्था निर्माण होणे. आपलेच दात आपलेच ओठ - आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीचे स्थिती निर्माण होणे. अंथरूण पाहून पाय पसरावे - आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च ठेवावा. आवळा देऊन कोहळा काढणे - क्षुल्लक गोष्टीचा मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे. आलीया भोगाशी असावे सादर - कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे अचाट खाणे मसणात जाणे - खाण्यापिण्यात अतिरके झाल्यास परिणाम वाईट होतो. आधी बुद्धी जाते नंतर लक्ष्मी जाते - अगोदर आचरण बिघडते नंतर दशा बदलते. आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला - ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो. तोच दोष आपल्या अंगी असणे. आपला तो बाब्या दुसर्‍याचं ते कारटं - स्वत:चे चांगले आणि दुसर्‍यांचे वाईट अशी प्रवृत्ती असणे. अळी मिळी गुप चिळी - रहस्य उघडकीला येऊ नये म्हणून सर्वांनी मूग गिळून बसणे. अहो रूपम अहो ध्वनी - एकमेकांच्या मर्यादा न दाखवता उलटपक्षी खोटी स्तुती करणे. 
نمایش همه...
117🔥 5👌 5🤔 2👏 1
♻संधी व त्याचे प्रकार♻ ✍जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात. ❇उदा. 1. विधालय : धा : द + य + आ 2. पश्चिम : श्चि : श + च + इ 3. आम्ही : म्ही : म + ह + ई 4. शत्रू : त्रू : त + र + ऊ 🌀 संधी: ❇स्वरसंधी - जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात. ❇उदा. 1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा 2. सूर्यास्त = सूर्य + अस्त 3. सज्जन = सत् + जन 4. चिदानंद = चित् + आनंद 🌀 संधीचे प्रकार: संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत. ❇स्वर संधी - एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. ♻दिर्घत्व संधी - 1. अ + अ = आ 2. आ + आ = आ 3. आ + अ = आ 4. इ + ई = ई 5. ई + ई = ई 6. इ + इ = ई 7. उ + ऊ = ऊ 8. उ + उ = ऊ ♻नियम - (1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो. ❇उदा. ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी (2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो. ❇उदा. एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ (3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते. ❇उदा. प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा (4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो. ❇उदा. 🗒ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन 🗒गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन 🗒गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर 🗒नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक 🌀व्यंजन संधी : एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात. उदा. 1. सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी) 2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी) ♻नियम - (1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात. ❇उदा. विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा (2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात. क्रमशः
نمایش همه...
94👍 2👏 1
मराठी व्याकरण 🔹लिंगविचार 🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप* *ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग रुप एकारांत होते उदा.... मुलगा -- मुलगी - मुलगे पोरगा -- पोरगी - पोरगे 🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रुपे होतात. उदा... कुंभार -- कुंभारीण सुतार -- सुतारीण पाटील -- पाटलीण वाघ -- वाघीण माळी -- माळीण 🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*. उदा... दास - दासी वानर -- वानरी तरुण - तरुणी 🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ* *वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा... लोटा - लोटी गाडा - गाडी दांडा -दांडी 🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय लागून होतात. उदा.... श्रीमान -- श्रीमती युवा - युवती भगवान - भगवती 🏀वरील बाबींचा सराव पाठातील जितके जास्त शब्द घेवून करता येईल तितके करावे. 🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर करता येईल .
نمایش همه...
97👌 4👍 3🙏 1