uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Ko'proq ko'rsatish
2025 yil raqamlardasnowflakes fon
card fon
222 185
Obunachilar
-324 soatlar
+727 kunlar
+1 13330 kunlar
Postlar arxiv
724) शाश्वत या अर्थाचा शब्दसमूह कोणता?Anonymous voting
  • 1)उरलेला
  • 2)आश्वात
  • 3)कायम टिकणार
  • 4)न टाळता येणारा
0 votes
24👍 7
723) दिलेल्या वाक्यप्रचारातून अचूक वाक्यप्रचाराची जोडी ओळखा?Anonymous voting
  • 1)अन्नास जागणे-नोकरी घालवणे
  • 2)अन्नन्नदशा होणे-कृतज्ञ असणे
  • 3)अन्नास लावणे-उदरनिर्वाह मदत करणे
  • 4)अन्नतील माती कालवणे-गरीब होण
0 votes
29👌 15👍 3🤔 1
🌷🌷विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून-🌷🌷 उदा. १)तो घरातून बाहेर पडला. २) तुझ्या हातून हे काम होणार नाही. वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून पंचमीचा कारकार्थ अपदान आहे. दुसऱ्या वाक्यात हातून या शब्दात ऊन हा प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे असे निर्विवादपणे म्हणू शकतो का? प्रत्ययावरून पंचमी म्हणाव तर कारकार्थ करण आहे म्हणजेच तृतीया विभक्ती यायला हवी. मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय असला पाहिजे? हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही. अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल. म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी काही हरकत नाही.
Hammasini ko'rsatish...
42👍 4
🔺संबोधन –🔻  संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते, त्याचा विकर होतो व प्रत्ययही लागतात. म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे. उदा. मुलांनो, खाली बसा.
Hammasini ko'rsatish...
25
🔴संबंध 🔴 – षष्ठी विभकीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदांशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध. केंव्हा केंव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो. उदा. रामाची बायको होती सीता.
Hammasini ko'rsatish...
31🔥 2
⚫️अपादान ⚫️ – क्रिया जेथून सुरू होते, तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्यास अपादान असे म्हणतात. पंचमीचा कारकार्थ अपादान आहे. उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.
Hammasini ko'rsatish...
32👍 1
🔶संप्रदान 🔶 – जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते, त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे, इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात, त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे. उदा. मी गुरूजींना दक्षिणा दिली.
Hammasini ko'rsatish...
23
🌷करण🌷– करण म्हणजे साधन. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, किंवा ज्याच्या साधनाने घडते, त्याला करण असे म्हणतात. तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे. उदा- आई चाकुने भाजी कापते.
Hammasini ko'rsatish...
31🔥 3👍 1
⚫️कर्म⚫️ – कर्त्याने केलेली क्रिया कोणावार घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते. तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती अप्रत्यक्ष चतुर्थी असते. उदा- राम रावणास मारतो.
Hammasini ko'rsatish...
28
▪️कर्ता ▪️– क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय. कधी कधी कर्त्याची विभक्ती प्रथमा असते. उदा- मीना पुस्तक वाचते.
Hammasini ko'rsatish...
23
⚫️विभक्तीचे प्रकार🔴 🔻प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो. 🔺 त्याला कर्ता असे म्हणतात. ही क्रि या कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात. 🔻नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो. विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात. 🔶प्रथमा 🔶द्वितीया 🔶तृतीया 🔷चतुर्थी 🔷पंचमी 🔷षष्ठी 🔷सप्तमी 🔷संबोधन
Hammasini ko'rsatish...
49
🌷विभक्ती- 🌷 ☄नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात. ☄कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय. ☄कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात ☄उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.
Hammasini ko'rsatish...
18
🌼पृथक्करण🌻 🌷विभक्तीचा शब्दशः अर्थ 'विभाजित होण्याची क्रिया किंवा भावना' किंवा 'विभाग' किंवा 'वाटा' आहे. 🌷व्याकरणात , प्रत्यय किंवा शब्दाच्या पुढे चिन्ह ( संज्ञा , सर्वनाम आणि विशेषण ) याला विक्षेपण म्हणतात, जे शब्द क्रियापदांशी कसे संबंधित आहे हे दर्शविते. 🌷संस्कृत व्याकरणानुसार , संज्ञा किंवा संज्ञा नंतर प्रत्यय 'आवक' असे म्हणतात जे नावे किंवा संज्ञा शब्दांना एक वाक्यांश बनविते (वाक्यांच्या वापरासाठी) आणि क्रियापद परिणामाद्वारे क्रियापदातील संबंध दर्शवितात. प्रथमा, द्वितीया, तृतीया इत्यादी विभाग आहेत 🌷 ज्यात एकल , द्वंद्वात्मक , अनेकवचन - तीन मुले आहेत  🌷. पॅनिनियन व्याकरणामध्ये , त्यांना 'सुपर' इत्यादि 24 मोजले गेले आहेत. संस्कृत व्याकरणात ज्याला 'विभक्ती' म्हणतात त्या शब्दाचा सुधारित भाग आहे. जसे, रामाणे, रमाये इ. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸
Hammasini ko'rsatish...
25
मराठी व्याकरण : वाक्यप्रचार व अर्थ✅ ✅नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे ✅ द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे ✅हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे ✅ गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे ✅अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे ✅पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे ✅वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे ✅कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे https://t.me/MARATHI
Hammasini ko'rsatish...
36👍 4🔥 2👌 1
🔹विशेषण खालील शब्दसमुह पहा.... चांगली मुले काळा कुत्रा पाच टोप्या निळे आकाश वरील शब्दसमुहात चांगली , काळा पाच निळे हे शब्द त्या त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात . 🏀 *नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात*. 🎾विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करते. 🏀साधारणपणे विशेषण नामाच्या पुर्वी येते. 🏀ज्या नामाबद्दल विशेषण माहिती सांगते त्या नामाला विशेष्य असे म्हणतात. उदा..... वर चांगली मुले यामध्ये चांगली हे विशेष पण मुले हे विशेष्य होय. काळा कुत्रा यामध्ये काळा हे विशेषण पण कुत्रा हे विशेष्य होय. निळे आकाश यामध्ये निळे हे विशेषणा पण आकाश हे विशेष्य होय. 🏀 *प्राथमिक स्तरावर विशेषणाचे प्रकार*----- 🎾 *गुणविशेषण* 🎾 *संख्याविशेषण* 🎾 *सार्वनामिक विशेषण* खालील शब्दसमुह पहा.... शुर सरदार ताजी भाजी 🏀 *नामाचा गुण किंवा विशेष दाखवला जातो त्यास गुणविशेषण म्हणतात. शुर हा सरदाराचा गुण दाखवला. ताजी हे भाजीबद्दल विशेष बाब दाखवते . 🏀 *संख्याविशेषण*---- आठ दिवस थोडी साखर ज्या विशेषणामुळे नामांची संख्या दाखवली जाते त्यास संख्याविशेषण म्हणतात. बारा महिने, तिसरा भाग आर्धा हिस्सा. 🏀 *सार्वनामिक विशेषण*-- हा कुत्रा ती बाग तुझा सदरा कोणता चित्रपट. वरील शब्दसमुहात ,हा , ती , तुझा ही सर्व नामे आहेत. सर्वनामापासून बनलेल्या विशेषणाना सार्वनामिक विशेषण म्हणतात
Hammasini ko'rsatish...
86🤔 3👌 3🔥 2👍 1
🔹वाक्य पृथक्करण 🔸पृथक म्हणजे वेगळे किंवा सुटे करणे असा होतो आणि वाक्यापृथक्करण म्हणजे वाक्यातील भाग वेगळा करून दाखविणे. 🔷वाक्य:⤵ उद्देश विभाग(उद्देशांग)↔विधेय विभाग (विधेयांग) 1)उद्देश (कर्ता)     ↔1) कर्म व कर्म विस्तार 2)उद्देश विस्तार     ↔2) विधानपूरक                            ↔3) विधेय विस्तार                            ↔4)  विधेय (क्रियापद) 💠उद्देश विभाग/उद्देशांग:💠 💠1)उद्देश (कर्ता) 🔸वाक्य ज्याच्या विषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. 🔸क्रियापदातील धातुला णारा, णारे, णारी, हे प्रत्यय जोडून कोण / काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर कर्ता येते. 🔶उदा.🔸 🔹रामुचा शर्ट फाटला. ➡(फाटणारे काय/कोण?) 🔹रामरावांचा कुत्रा मेला. ➡(मरणारे कोण/काय?) 🔹मोगल साम्राज्याचा अंत झाला. ➡(होणारे-कोण/काय?) 🔹रामुच्या घराचा दरवाजा उघडला. ➡(उघडणारे कोण/काय?) 👉वरील वाक्यात शर्ट, कुत्रा, अंत, दरवाजा हे उद्देश (कर्ता) आहेत. 💠2) उद्देश विस्तार 🔸कर्त्याविषयी माहिती सांगणारे शब्द जर कर्त्यापूर्वी असतील. तर अशा शब्दांना उद्देश विस्तारात लिहावे. 🔶उदा.🔸     🔸शेजारचा रामु धपकन पडला.नियमित अभ्यास करणारे विधार्थी पास होतात. 🔶विधेय विभाग/विधेयांग. 🔸वाक्यात ज्यांच्यावर क्रिया घडते ते कर्म असते म्हणजेच क्रिया सोसणारे कर्म असते. 🔶उदा.🔸 🔹रामने झडाचा पेरु तोडला. ➡(या वाक्यात तोडण्याची क्रिया पेरु वर झाली म्हणून ते कर्म.) 🔹गवळ्याने म्हशीची धार काढली. ➡(या वाक्यात काढण्याची क्रिया धारेवर झाली म्हणून ते कर्म) 💠1) कर्म विस्तार 🔷कर्मापूर्वी कर्माविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे कर्म विस्तार होय. 🔶उदा.🔸 🔸रामने झाडाचा पेरु तोडला.गवळ्याने काळ्या म्हशीची धार काढली. 💠2) विधान पूरक 🔷कर्त्याविषयी माहिती सांगणारा शब्द जर कर्त्यांनंतर आला तर ते विधानपूरक असते. 🔶उदा.🔸     🔸राम राजा झाला.संदीप शिक्षक आहे.शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. वरील वाक्यावरुन राजा, शिक्षक, मोहक ही शब्द कर्त्याविषयी अधिक महितीसांगत आहेत म्हणून त्यांना विधानपूरक असे म्हणतात. 💠3) विधेय विस्तार 🔷क्रियापदास विधेय असे म्हणतात. 🔸वाक्यात क्रियापदाविषयी माहिती सांगणार्या  शब्दांचा यात समावेश होतो. क्रियापदाला केव्हा/ कोठे/ कसे ने प्रश्न विचारल्यास विधेय विस्तार उत्तर येते. ही सर्व क्रियाविशेषणे असतात. 🔶उदा.🔸    🔸कुटुंबातील सर्व व्यक्ती रविवारी वनभोजनास गेले.शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो.माझा जिवलग मित्र मनीष माझे पत्र पाहताच त्वरित आला. 💠4) विधेय/क्रियापद 🔷वाक्यातील क्रियापदाला विधेय असे म्हणतात. 🔶उदा.🔸 🔸रमेश खेळतो. 🔸रमेश अभ्यास करतो. 🔸रमेश चित्र काढतो. आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @marathi येथे क्लिक करा व चॅनेल ओपन झाले की join ऑप्शन वर क्लिक करा.
Hammasini ko'rsatish...
83👍 8👌 5😁 1🤔 1
🔹अलंकार 〰〰〰〰〰〰〰 🔶व्याख्या:- कोणतेहि गद्य वा काव्य श्रवणीय वा रसपूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा (काव्यात्मक) साचा म्हणजे अलंकार . 〰〰〰〰〰〰〰 🔶अलंकारांचे प्रकार:- ✔ १) उपमा:- उपमा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. 〰〰 〰〰〰〰〰 1. "दोन वस्तूंतील साम्य एका विशिष्ट रीतीने वर्णन केलेले असते तेथे उपमा अलंकार होतो." 2. या अलंकारात दोन भिन्न गोष्टीत साम्य पाहिले जाते. 'एक वस्तु दुसर्या वस्तूसारखी आहे' असे वर्णन असते. दोन वस्तूतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जेथे वर्णन केलेले असते तेथे उपमा हा अलंकार होतो. 🔺उदा: सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळा गत माया तुझी आम्हांवरी राहू दे 〰〰〰〰〰〰〰 ✔२) उत्प्रेक्षा:- उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. 〰〰〰〰〰〰〰 1. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. (जणू,गमे,वाटे,भासे,की) 🔺उदा: ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू. सोने-चांदी-रत्नमाणकांचे दुकानच हे जणू. अत्रीच्या आश्रमी नेले मज वाटे माहेरची वाटे खरेखुर 〰〰〰〰〰〰〰 ✔३) अपन्हुती:- (अपन्हुती म्हणजे लपविणे/ झाकणे) अपन्हुती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. 〰〰〰〰〰〰〰 1. "उपमेयाचा निषेध करून ते उपमानच आहे असे जेव्हा सांगितले जाते तेव्हा 'अपन्हुती' हा अलंकार होतो." 🔺उदा.- न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजातिल | न हे वदन, चंद्रमा शरदिचा गमे केवळ || 🔺स्पष्टीकरण- प्रस्तुत उदाहरणात 'कमळातल्या पाकळ्या' आणि 'शरदिचा चंद्रमा' या उपमानांनी अनुक्रमे 'नयन' आणि 'वदन' या उपमेयांना नाकारल्यामुळे इथे 'अपन्हुती' अलंकार झालेला आहे. 🔺अन्य उदाहरणे- 1. हे हृदय नसे परी स्थंडिल धगधगलेले | 2. ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे | 3. आई म्हणोनि कोणी आईस हाक मारी , ती हाक येई कानी मज होय शोक भारी , नोहेच हाक माते मारी , कुणी कुठारी 〰〰〰〰〰〰〰 ✔४) अन्योक्ती:- अन्योक्ती हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. 〰〰〰〰〰〰〰 1. दुसर्यास उद्देशून केलेली उक्ती. 2. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसर्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. 🔺उदा:- येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे मधुर तू करिशी अनेक हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक कोकिल वर्ण बघुनि म्हणतील काक ➖➖➖➖➖➖➖
Hammasini ko'rsatish...
62🔥 9🙏 4👍 2👌 2
From Marathi Mhani app: घोड्यावर हौदा, हत्तीवर खोगीर. Meaning: एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग.
Hammasini ko'rsatish...
22
From Marathi Mhani app: घोडे खा‌ई भाडे. Meaning: ज्या धंद्यात विशेष फायदा नाही तो धंदा.
Hammasini ko'rsatish...
19🔥 3
From Marathi Mhani app: गाव करी ते राव न करी. Meaning: श्रीमंत माणूस पैशाच्या जोरावर जे करु शकणार नाही ते सामान्य माणसे एकीच्या जोरावर करु शकतात.
Hammasini ko'rsatish...
37🙏 2